सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कोकणात आंगणेवाडीची यात्रा सुरू झाली आहे. या दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एका मालवणी तरुणाने पाकिस्तानी पत्रकार चांदल नवाब यांच्या स्टाइलने रिपोर्टिंग केले आहे. बजरंगी भाईजान या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने पाकिस्तानी पत्रकार चांद नवाबची भूमिका साकारली होती. पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब हे त्यांच्या रिपोर्टिंगसाठी लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत,असाच एक व्हिडीओ मुंबईच्या तरुणाचा व्हायरल झाला आहे. यामध्ये तो तरुण चांद नवाबच्या भूमिकेत दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तो तरुण एका स्टेशनच्या फूटओव्हर ब्रिजवर दिसत आहे आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार चांद नवाब यांच्याप्रमाणे मराठीत वार्तांकन करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यानंतर तिथे येणाऱ्या लोकांकडून त्याला त्रास दिला जात आहे. यामुळे तो रिटेकनंतर रिटेक घेत आहे.
बापरे! मुलाशी केलेली मस्करी आईच्या अंगलट आली; दारावर पोलीस उभे राहिले मग...
कोकणात आंगणेवाडीची यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेसाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, एका रेल्वेस्थानकावर एका मालवणी तरुणाने हा व्हिडीओ बनवला आहे. या तो तरुण मालवणी बोलत असल्याचे दिसत आहे. या तरुणाचे हावभाव अनेकांना आवडले आहेत. या तरुणाचे सर्वांनी कौतुक केले आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, 'खूप मजेदार व्हिडिओ'. दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'मला नवाजुद्दीन सिद्दीकी आठवले.'चांद नवाब 2.0.' अशा अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.
बजरंगी भाईजान या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने रिपोर्टर चांद नवाबची भूमिका अतिशय उत्तमपणे साकारली होती. त्यांच्या या कृतीचीही खूप चर्चा झाली.