सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे प्रवास करण खूप महाग झालं आहे. सध्या विमानाचं तिकिट व्हायरल झालं आहे. हे तिकिट मुंबई- गोव्याच आहे. या तिकिटाचा दर पाहून नेटकरीही आवाक झाले आहेत. ही तिकिट ४८ वर्षे जुने आहे.
ऑर्डर केलेला पिझ्झा २ इंचांनी छोटा दिला म्हणून तक्रार करणारी 'ती' होतेय व्हायरल...
सध्या आपण कुठेही गेलो तर फक्त नास्टा करण्यासाठीच १०० रुपयांपर्यंत खर्च करतो. या खर्चात तेव्हा मुंबईतून गोवा प्रवास होत होता. यावेळी तिथे डोसा २ रुपयांना, चहा ५० पैशांना आणि इतर अनेक गोष्टी ५० रुपयांना मिळत होत्या दरम्यान या काळातीव विमान तिकिट व्हायरल झाले आहे.
ज्या प्रवासासाठी तुम्ही आज हजारो रुपये मोजता, ते ४८ वर्षांपूर्वी फक्त ८५ रुपये दिले जात होते. १९७५ चे इंडियन एअरलाइन्सचे तिकीट ट्विटरवर व्हायरल होत आहे, यामध्ये भाड्याच्या ठिकाणी फक्त ८५ रुपये लिहिलेले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तिकीट पाहून नेटकरी आवाक झाले आहेत. आजकाल या प्रवासासाठी किमान १८०० आणि कमाल १२ हजारांपर्यंत तिकीट पर्याय उपलब्ध आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे तिकीट ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे. अनेकांनी या पोस्टला कमेंट केल्या आहेत. या पोस्टमध्ये, मुंबई ते गोवा८५ रुपयांमध्ये अशी कॅप्शन दिली आहे. काही तासांतच १८ हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली असून शेकडो लोकांनी ती लाईक केली आहे.