सध्या सोशल मीडियावर जुने बील व्हायरल होत आहेत. काही दिवसापूर्वी एका हॉटेल मधील बील व्हायरल झाले होते. हे बील फक्त २४ रुपयांच्या होते. काल १९८६ मधील बुलेटचे बील व्हायरल झाले आहे. या बुलेटची किंमत फक्त १७ हजार रुपये होती. आता ८३ वर्षापूर्वीचे एक वीज बील व्हायरल झाले आहे. ८३ वर्षापूर्वी वीजेचे दर किती होते, ते या बिलावरुन समजते. हे बील पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हे बील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
हे वीज बील १९४० सालचे आहे. त्यावेळी वीज महिन्याची फक्त ५ रुपयांना मिळत होती. आता एका युनिटचे दर पाच रुपये झाले आहेत.सोशल मीडियावर नेटकरी जुन्या बीलाची आणि आताच्या वीज दराची तुलना करत आहेत.
आता विना विजेचे कोणीही राहू शकत नाही, देशात सर्व ठिकाणी वीज पोहोचली आहे. घरातील काहीवेळ वीज गेली तर अनेकजण लगेच तक्रार करतात. घरात वीजेवर चालणाऱ्या टीव्ही, फ्रीज, एसी अशा अनेक वस्तु आहेत. या गोष्टींची आपणाला सवय लागली आहे. त्यामुळे आताच्या वीज दरा प्रमाणे प्रत्येकाचे साधारण १ हजार रुपये वीज बील येते, पण ८३ वर्षापूर्वी महिन्याचे वीज बील फक्त ५ रुपये येत होतं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल बील मुंबईतील आहे. या बीलमध्ये फक्त ३ रुपये १० पैशांची वीज वापरल्याचे दिसत आहे, तर सर्व कर पकडून हे बील ५ रुपये २ पैसे आले आहे. त्या काळात वीज बील हाताने लिहून येत होते.
या बिलानुसार, महिन्या भरात २९ युनिट वीजेसाठी एकूण ३ रुपये १९ पैसे बील आले. या बिलावर एका युनिटचा चार्ज २ पैसे लिहिले आहे. काही अन्य चार्जेस लावून बील ३ रुपये १० पैसे आहे. या बीलावर टॅक्स तसेच ड्युटी २ रुपये ४३ पैसे लावलेले दिसत आहे. या हिशोबावरुन ग्राहकाला एकूण ५ रुपये २ पैशाचे बील आले आहे. आता वीजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ५ रुपये प्रति युनिट एवढे दर आहेत. यासह २०० रुपये फिक्स एनर्जी चार्जही वसुल केला जातो.