आपल्याकडे नोकरीला असल्यावर किंवा शिक्षण घेत असताना सु्ट्टीवर जात असताना रजेसाठी अर्ज करावा लागतो. तो अर्ज आपल्याला आपल्या वरिष्ठांना करावा लागतो. पण, अर्ज लिहिण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. सध्या एका शाळेतील रजेचा अर्ज चांगलाच व्हायरल झाला आहे. एका मुलाने हा अर्ज लिहिला आहे. आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी या अर्जाचा फोटो शेअर केला आहे. हा अर्ज तुम्हाला फक्त हसवणार नाही तर त्याची मूळ भाषा देखील तुमची मन जिंकेल. सध्या हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बुंदेलखंडी भाषेत लिहिलेला हा अर्ज अनेकांना आवडला आहे. या विद्यार्थ्याने आपली सर्व समस्या देसी शैलीत शिक्षकांसमोर मांडली आहे. 'दोन दिवसापासून माझ्या अंगात ताप आहे, त्यामुळे आम्ही शाळेत येऊ शकत नाही. म्हणून माझी अशी विनंती आहे की, तुम्ही दोन-चार दिवस सुट्टी दिली पाहिजे, आणि आम्ही आलो नाही तर तुमची शाळा कोण बंद पाडणार? या अर्जाच्या शेवटी, मुलाने लिहिले, 'तुमाओ अग्याकरी शिष्य "कलुआ", हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर वीज गेली, तरीही मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली
या अर्जाचा फोटो आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी शेअर केली आहे.त्यांनी योसोबत एक कॅप्शन दिली आहे.सुट्टीसाठी रजेचा अर्ज! व यात हसण्याचा इमोजी आहे. आतापर्यंत या पोस्टवर 10 हजारांहून अधिक लाईक्स आहेत आणि 1400 हून अधिक वेळा रिट्विट करण्यात आले आहेत. या पोस्टवर एका यूजरने 'ओरे मेरे कलुआ तूने कटाई हड्ड कडाई, अब झाई तारीकन से हमॉ छुटिया मंगईये' अशी मजेशीर कमेंट केली आहे.