Viral News: सोशल मीडियावर दररोज काहीतरी नवीन गोष्ट व्हायरल होत असते. अशातच एका रेजिग्नेशन लेटरची (नोकरी सोडण्यासाठी दिलेले पत्र) सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या लेटरबाबत हजारो लोक चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे, या राजीनामा पत्रात फक्त तीन शब्दांचा वापर करण्यात आला आहे. नेटकरी या लेटरला ‘सिंपल आणि ऑन पॉइंट’ म्हणत आहेत.
अनेकदा राजीनामा देताना कर्मचारी बराच विचार करतो. राजीनामा पत्रात अनेक गोष्टी लिहील्या जातात. अनेकांना कंपनीच्या मालकासोबत नाते खराब करायचे नसल्यामुळे, अनेक चांगल्या गोष्टी त्यात लिहीतात. पण, यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या लेटरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या व्यक्तीने लेटरमध्ये फक्त तीन शब्द लिहीले- "Bye bye Sir" हे शब्द लिहीन त्याने नोकरी सोडली.
फोटोवर मजेशीर कमेंट्सट्विटर युझर @MBSVUDU ने त्याच्या अकाउंटवरुन या आगळ्यावेगळ्या राजीनामा पत्राचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक आणि 60 हजारांपेक्षा जास्त रिट्वीट मिळाले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या पोस्टवर एक युझरने कमेंट केली- "कमीत कमी, हे फॉर्मल आहे." दुसऱ्या एकाने लिहीले- "हा अतिशय सिंपल आणि स्ट्रेट फॉर्वर्ड आहे. कुणालाही एक्सप्लेन करण्याची गरज नाही."
अनेक लेटर शेअर होतायतहा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकजण विविध मजेशीर राजीनामा पत्र शेअर करत आहेत. एका युझरने फोटो शेअर केला. त्यात लिहीले होते- "डिअर सर, मज्जा येत नाहीये." दुसऱ्याने लिहीले-" रिस्पेक्टेड सर, इथपर्यंतच साथ होती."