Viral Photo Trending News: आजकाल सोशल मीडियावर एकापेक्षा एक अजब किस्से व्हायरल होत असतात. एक विचित्र घटना घडली की लगेच त्याची चर्चा होते. एखादा फोटो किंवा एखादा व्हिडीओ अतिशय झटपट वाऱ्यासारखा पसरतो आणि त्यामुळे त्या प्रकरणाची चर्चा होते. असाच एक बसस्थानकाना फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. वास्तविक, बसस्थानकाच्या एकमेव बाकावर मुले-मुली एकमेकांच्या मांडीवर बसले आहेत. आजूबाजूला फारसे कोणी नसले तरी हे मुले-मुली एकमेकांच्या मांडीवर बसले असून हा फोटो चर्चेत आहेत.
नक्की काय आहे हा संपूर्ण प्रकार?
मूळात हा बसस्थानक केरळच्या त्रिवेंद्रम (Trivandrum) शहरातील आहे आणि हा फोटो मुला-मुलींनी एका गोष्टीचा निषेध म्हणून काढला आहे. या बसस्थानकावर आधी एक अखंड असा मोठा बाक होता. पण या बाकावर मुले-मुली एकत्र बसण्यास त्रिवेंद्रमचे स्थानिक लोक विरोध करत होते. यावरून हा संपूर्ण वाद (Controversy) सुरू झाला. या प्रकरणी आता प्रशासनाने कारवाईची भूमिका घेतली असून बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुला-मुलींनी मांडीवर बसून का नोंदवला निषेध?
बसस्थानकावरील या बाकावर मुला-मुलींनी एकत्र बसू नये म्हणून स्थानिक लोकांनी बेंचचे तीन भाग केले होते. यानंतर तरुण-तरुणींनी थेट एकमेकांच्या मांडीवर बसून निषेध नोंदवला. त्यानंतर या बसस्थानकाकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. मात्र आता प्रशासनाने हा बाक हटवला असून नवा बाक बसवणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाबाबत महापौरांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, अशा प्रकारे बसण्याचा बाक कापणे 'अयोग्य' आहे. अशी घटना केरळसारख्या पुरोगामी राज्यातील समाजासाठी अन्यायकारक आहे. राज्यात (केरळ) मुला-मुलींनी सोबत बसण्यास बंदी नाही. बसस्थानकावरील बाक तोडणे मान्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.