समाजात असे अनेक लोक आहेत. ज्यांना दोनवेळचं अन्न खायला काय तर पाहायलाही मिळत नाही. भिक मागून, कोणाकडे तरी विनंती करून मिळालं तर मिळालं नाही तर असंच उपाशी झोपावं लागतं. पण काहीजण असे असतात जे स्वतःचा विचार करत असतानाच समाजातील इतर लोकांसाठीही काही करण्याची इच्छा मनात ठेवून आपलं काम सुरू ठेवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची माहिती देणार आहोत. दिल्लीमध्ये एक असं स्वयंपाक घर आहे जिथे भुकलेल्यांना आणि गरिबांना फक्त एका रुपयात पोटभर जेवण मिळतं.
प्रवीणकुमार गोयल हे दिल्लीतील रहिवासी आहे. नांगलोई परिसरात शिवमंदीराजवळ श्याम रसोई नावानं प्रवीणकुमार आपलं छोटंसं दुकान चालवतात. या स्वयंपाकघराची खासियत म्हणजे फक्त १ रुपयात लोकांना जेवण दिलं जातं. लोकांनी फुकट समजून जेवणं वाया घालवू नये यासाठी हा एक रूपया घेतला जातो. सोशल मीडियावर प्रवीण कुमार यांच्या कार्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. वाह, नशीब चमकलं; दोन दिवसात बाबा का ढाब्याचा कायापालट, पण आजोबा आहेत तरी कुठे?
५१ वर्षीय प्रवीण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''रोज जवळपास १ हजार लोकांना जेवण या ठिकाणी दिले जाते. तसंच लोकांना वाटलं तर कधी पैसे, कधी रेशन याची मदत मला करतात. सुरूवातीला मी १० रुपयांना जेवणाची थाळी पूरवत होतो. त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी, त्याचे पोट भरण्यासाठी मी फक्त १ रुपया जेवणासाठी स्वीकारायचं ठरवलं.'' सोशल मीडियावर प्रवीणकुमार यांच्या स्वयंपाक घराचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. २८८ पेक्षा जास्त लोकांनी या फोटोंना रिट्विट केलं असून १ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या फोटोंनाला मिळाले आहेत. लोकांनी या फोटोवर कौतुकास्पद कमेंट्स केल्या आहेत. कडक सॅल्यूट! फक्त ४ तासात ६८ वर्षांच्या आजींनी चिमुरड्या नातवासह सर केला हरिहर गड