देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक हैराण झाले आहेत. संक्रमण रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू आणि लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अशात सोशल मीडियावर व्हायरल हा फोटो लोकांचं मन जिंकत आहे. या फोटो एक पोलीस हॅंडपंपने एका मोकाट कुत्र्याला पाणी पाजताना दिसत आहे. हेच कारण आहे की, इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या पोलिसाचं लोक भरभरून कौतुक करत आहेत.
हा फोटो आयपीएस अधिकारी @SukirtiMadhav यांनी ट्विटवर शेअर केलाय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जर एक व्यक्ती कुत्र्यावर प्रेम करत असेल तर ती एक चांगली व्यक्ती आहे. सोबतच जर कुत्रा माणसावर प्रेम करत असेल तरीही तो चांगला आहे. अतुल्य बनारस!'. त्यांचं हे ट्विट व्हायरल झालं आहे. हे आर्टिकल लिहून होईपर्यंत याला ७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि सहाशेपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. सोबतच अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

हा फोटो ७ मे रोजी ट्विटर हॅंडल @policemedianews वरून शेअर करण्यात आला आणि कॅप्शन लिहिले होते की, 'हा फोटो बाबांची नगरी काशी विश्वनाथवाल्या वाराणसी पोलीस कमिश्नरेटचा आहे. पोलीस नेहमीच सेवा आणि सुरक्षेच्या भावनेने कार्य करतात. पोलीस कमिश्नरेटचा आहे. पोलीस नेहमीच सेवा आणि सुरक्षेच्या भावनेने कार्य करतात'.