काही फोटो आपल्याला संभ्रमात टाकणारे असतात. नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय याबाबत पटकन लक्षात येत नाही. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला झाडांची सुकलेली पानं दिसून येतील. पण नीट पाहिल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की, या पानांवर एक पाल येऊन बसली आहे. तुम्हाला या फोटोतील पाल शोधायची आहे. घरी बसून तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही पाल शोधण्याच्या निमित्ताने तुमच्या डोळ्यांचा व्यायामही होईल.
आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Satanic Leaf-Tailed Lizard) असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. तुम्हाला हा फोटो पाहून वाटेल पानांचा आकार पालीप्रमाणे झाला आहे. पण ही खरीखुरी पाल आहे. मादागास्करच्या वर्षावनांमध्ये दिसून येते. याआधी तुम्ही अशी आगळीवेगळी पाल कधीही पाहिली नसेल.
रमेश पांडे यांनी २९ मे ला हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, त्यानंतर सोशल मीडियावर या पालीचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोला ३०० पेक्षा जास्त लाईक्स आणि ६३ पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. अनेकांनी झाडाच्या फांदीवर पाल बसलेली नाही असं म्हटलं आहे. तर काहींनी पालीला शोधून दाखवण्याचा आनंद कमेंट्सच्या माध्यामातून व्यक्त केला आहे.
टोळांची धाड पळवून लावण्यासाठी शेतकऱ्याने केलाय भन्नाट जुगाड! पाहा व्हायरल व्हिडीओ
बापरे! प्रेमविवाह करणं चागलंच अंगाशी आलं; नातेवाईकांनी भर रस्त्यात 'असं' काही केलं....