गेल्या काही दिवसापासून एलॉन मस्क चांगलेच चर्चेत आले आहेत. मस्क यांनी गेल्या महिन्यातच ट्विटर विकत घेतले. जेव्हापासून ते ट्विटरचे नवीन बॉस बनले आहेत, तेव्हापासून त्यांचे प्रत्येक ट्विट सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे,त्यांच्या एका ट्विटवर यूपी पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून रिप्लाय देण्यात आला आहे. त्यामुळे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.
एलॉन मस्क यांनी काही दिवसापूर्वी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी विचारले होते की, ते जेव्हा ट्विट करतात तेव्हा ती कृती मानली जाईल का? म्हणजे त्यांच्या भाषणाचे ट्विट कामात गणले जाते की नाही. यावर जगभरातून लोकांनी रिप्लाय दिला होता. मात्र या सगळ्यामध्ये यूपी पोलिसांनी केलेल्या एका ट्विटने अनेरकांच्या भुवया उंचावल्या. पोलिसांचे ट्विट तुफान व्हायरल झाले आहे.
यावर रिप्लाय देताना यूपी पोलिसांच्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, यूपी पोलिसांनी तुमची समस्या सोडवली तर ते काम म्हणून गणले जाते. यानंतर, यूपी पोलिसांनी हॅशटॅग टाकून ट्विटर सेवा यूपी लिहिली आणि एलॉन मस्क यांनाही टॅग केले.
उत्तर पत्रिकेत 'X' ची व्हॅल्यू लिहिलेली पाहून शिक्षकांनी थेट पालकांनाच बोलावलं आणि....
हे ट्विट व्हायरल होताच लोकांनी भरभरून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत एका यूजरने भन्नाट कॅप्शन दिली आहे. "विनोद पाहत आहे की यूपी पोलीस आता आंतरराष्ट्रीय झाले आहेत' अशी कॅप्शन दिली आहे. यूपी पोलिसांच्या या ट्विटवर एलॉन मस्ककडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.