एक बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असते. बसमध्ये ३० ते ४० विद्यार्थी प्रवास करत असतात. बस सुरू असताना अचानक बस चालकाला हृदयविकाराचा झटका येतो. चालक तडफडू लागतो, तेवढ्यात क्षणाचा विचारही न करता एक मुलगा जागेवरुन उठतो आणि बसच स्टेअरिंग हातात घेतो. बसला अगोदर बाजूला घेऊन थांबवतो आणि चालकाच्या छाती दाबू लागतो. आता हे सर्व वाचून तुम्हाला एखाद्या चित्रपटातील सीन वाटत असेल. पण, ही घटना खरी आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी त्या विद्यार्थ्यांच कौतुक केलं आहे.
रस्ते अपघाताच्या घटना अनेक ठिकाणी घडतात. हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, वाहन चालवताना चालकांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना पाहिल्या आहेत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे.या घटनेत एका शाळकरी मुलाने बसमधील अनेक विद्यार्थ्यांचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे.
या व्हिडीओमध्ये स्कूल बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याचे व्हिडीओत दिसत आहे. कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित वाहनांच्या चालकांचे काम खूप आव्हानात्मक असते कारण त्यांच्याकडे प्रवाशांची जबाबदारी असते. पण अचानक ड्रायव्हरला काही झालं तर सर्वांचा जीव धोक्यात जातो.
या व्हिडीओमध्येही असेच एक प्रकरण चित्रीत झाले आहे. या बसमध्ये लहान मुले बसमध्ये बसलेली असून चालक बस चालवत असल्याचे दिसून येत आहे. अचानक ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका येतो. यानंतर त्या बसचालकाला वाचवण्यासाठी मुल जवळ येतात.चालक शुद्धीत येतो तेव्हा त्यांच्या शेजारी बसलेला एक १३ वर्षांचा मुलगा स्टेअरिंग ताब्यात घेऊन बसलेला दिसतो. सर्व मुले घाबरतात पण स्टेअरिंग चालवणारा मुलगा शांत राहते बस चालवतो. मग तो स्टेअरिंगवरून हात काढून ड्रायव्हरची छाती दाबू लागतो. बस चालताना दिसत आहे. तेवढ्यात दुसरा मुलगा जवळ येतो आणि बस थांबवतो. त्यामुळे मुलांचे प्राण वाचतात.
या व्हिडीओला ९५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्या मुलाचे अनेकांनी कौतुक केले आहे.