पतंग उडवण्याची हौस लहान मुलांपासून मोठ्या मुलांपासून सगळ्यांनाच असते. पण पतंग उडवणं अनेकांच्या अंगाशी आल्याच्या अनेक घटना तुम्ही याआधी पाहिल्या असतील. पतंगाचा मांजा धार धार असल्यामुळे अनेकांना जखमा होतात. कोणाला डोळ्याला लागतं तर कोणाला हाताला. अशीच एक घटना समोर येत आहे. इंडोनेशियाच्या लम्पुग, प्रिंगसेवू रिजेन्सी येथील शाळेत पतंग उडविण्याच्या कार्यक्रमादरम्यान एक मोठा अपघात घडला आहे.
१ डिसेंबर रोजी लम्पुंगच्या प्रिंगसेवू रिजेन्सी येथील एका हायस्कूलमध्ये ही घटना घडली. या धक्कादायक घटनेत इंडोनेशियातील 12 वर्षांचा मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. एक मोठा पतंग उडविणारा १२ वर्षाचा मुलगा पतंगासह हवेत ३० फूट उडी मारून खाली कोसळला आणि यात तो गंभीर जखमी झाला. या वेदनादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा प्रिंगसेवू रीजेंसी येथे पतंग उडवत होता. दरम्यान तो पतंगासह ३० फूट उंच उडाला. मोठ्या पतंगामुळे तो हवेत उडाला व खाली कोसळला. प्रिंगसेवू चाईल्ड प्रोटेक्शन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, या दुर्घटनेनंतर मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. जेथे त्याच्या हातात सहा ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचं दिसून आलं, त्याला इतरही अनेक जखमी झाल्या आहेत. खरंच? सेलमध्ये होतेय सोन्याच्या महालाची विक्री; किचनपासून टॉयलेटपर्यंत सगळं सोन्याचं, पाहा फोटो
कोकोनट जकार्ता मधील माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाच्या भावाने सांगितले की, तैवानच्या नान्टेलियो या पतंगोत्सवात ही घटना घडली होती. ही मुलगी पतंग पकडून उभी होती. तेव्हा वाऱ्यामुळे पतंग उडाला व यासोबत मुलगीही काही अंतरापर्यंत उडाल्याची घटना घडली होती. घटनेच्या वेळी त्याचे भाऊ-बहीण पतंग उडवत होते. ऑगस्टमध्ये अशाच एका घटनेत एक ३ वर्षांची मुलगी एका मोठ्या पतंगाच्या तारेत अडकली होती. काय सांगता? व्यापाऱ्यानं ९ लाखाला घेतला करामती दिवा; खरं कळल्यानंतर डोकं आपटत बसला