तसे स्वभावाने हत्ती फार शांत असतात. पण त्यांना राग आला आणि ते चिडले तर काही खैर नाही. समोर असलेल्या प्रत्येक वस्तूला ते उद्ध्वस्त करून सोडतात. सध्या सोशल मीडियात एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून मनात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ पहिल्यावर लक्षात येतं की, हत्तीसारखा प्राणी समोर असल्यावर कशाप्रकारे माणसाचं डोकं काम करणं बंद करतं.
हा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ रिटायर्ड आयएफएस अधिकारी द्गिविज सिंह खाटी यांनी शेअर केलाय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, फार अद्भूत प्रकारे स्वत:ला वाचवलं. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि १ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
यात तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती सायकलसहीत जमिनीवर पडली आहे. त्याच्याजवळ एक हत्ती आहे जो सोंडेने त्याची सायकल उचलतो. नंतर त्या व्यक्तीला सोंडेने इकडे-तिकडे करतो. व्हिडीओत शूट करणारा व्यक्ती हत्तीजवळ असलेल्या व्यक्तीला तेथून पळून जाण्यास सांगतो. पण तो घाबरलेला असल्याने बराच वेळ तिथेच पडून राहतो. एक वेळ अशीही येते की, वाटतं आता हत्ती त्याला पायाखील चिरडेल. पण त्या व्यक्तीचं नशीब चांगलं होतं. तो संधी पाहून तेथून पळाला. त्यानंतर हत्ती त्या व्यक्ती सायकल सोंडेने वर उचलतो आणि चालू लागतो.
हे पण बघा :
जन्मताच कुत्रीची पिल्लं मेलीत, तिने मांजरीचे पिल्लं घेतली दत्तक!
देव तारी त्याला कोण मारी.... भरधाव वेगानं जाणाऱ्या पोलिसाला म्हशीनं दिली धडक; पाहा व्हिडीओ
OMG : अंगणात झोपलेल्या महिलेच्या तोंडात शिरला 4 फुटांचा साप, अन्...