Viral Video: यंदा मार्च महिन्यापासूनच कडक उन्हाची सुरुवात झाली आहे. उन्हामुळे त्रासलेले लोक बाहेर पडणे टाळताहेत. एखादे महत्त्वाचे काम असेल, तरच सर्व काळजी घेऊन घराबाहेर पडत आहेत. यातच उन्हापासून बचावासाठी लोक अनेक प्रकारचे 'देशी जुगाड' करताना दिसतात. अशाच एका देशी जुगाडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कडक उन्हात करतोय अंघोळइंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन तरुण कडक उन्हात स्कूटीवर फिरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ते नुसते फिरत नसून, सोबत एक पाण्याने भरलेली बादली घेतली आहे आणि स्कुटीवरच अंघोळही करत आहेत. फेसबुकवर व्हिडिओ शेअर करणाऱ्या नवजीत परिहारने हा व्हिडिओ राजस्थानमधील जोधपूरचा असल्याचा दावा केला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ शेअर करताना यूजरने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'यंदा मार्चमध्येच उष्णता इतकी वाढली आहे.' कॅप्शनसोबत युजरने जोधपूरचा हॅशटॅग वापरला आहे. लोक या व्हिडिओला प्रचंड लाइक आणि शेअर करत आहेत. उन्हापासून सुटका करण्यासाठी हा जुगाड लोकांना आवडला असेल, पण प्रत्यक्षात प्रयत्न करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. 30 सेकंदांचा हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.