एखाद्या मरणाऱ्या व्यक्तीचा जीव तोच वाचवू शकतो ज्याला जीवाची पर्वा असते. आता हेच बघा ना....एक कावळा मरणाच्या दारात उभा होता. पण त्याची वेळ झालेली नव्हती. अचानक एका अस्वलाने त्याचा जीव वाचवला.
सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिलंय की, 'या अस्वलाने कावळ्याचा जीव वाचवून फार मोठा काही बदल केला नाही. पण त्याने कुणाचातरी जीव वाचवून स्वत:चं जीवन नक्की बदललं. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांची मदत नक्की करा'. आतापर्यंत या व्हिडीओला 15 हजार व्ह्यू मिळाले आहेत.
एक कावळा पाण्यात पडतो. अनेक प्रयत्न करूनही तो बाहेर येऊ शकत नाही. अशात बाजूला असलेला अस्वल येतो आणि कावळ्याला पाण्यातून बाहेर काढतो. काही वेळाने कावळा बरा होतो आणि उडू लागतो. कावळा अस्वलाकडे बघतो, पण अस्वल त्याचं जेवण करण्यात बिझी असतो.
हा व्हिडीओ लोकांच्या मनाला फारच भिडलाय. अनेकजण यातून प्राण्यांची प्रामाणिकता सांगताहेत तर काही लोक जीवनाचा सार सांगत आहेत. काही असो पण अस्वलाने कावळ्याचा जीव वाचवला ही आनंद देणारीच बाब आहे आणि खूपकाही शिकवून जाणारी सुद्धा.