मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या VIP रोडवर एका तरूणीने तलावात उडी घेतल्याने एकच खळबळ उडाली. बराचवेळी तरूणी हाय-पाय मारत तरंगत राहिली. नंतर तिच्या भावाने येऊन तिचा जीव वाचवला. त्यानंतर तेथील बचाव पथकाने दोघांना बोटीतून बाहेर काढलं. तरूणीला उपचारासाठी हमीदियाह हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
पोलीस अधिकारी डीपी सिंह यांनी सांगितलं की, एअरपोर्ट परिसरात राहणारी निकिता मीनाचं काही कारणावरून परिवारातील सदस्यांसोबत भांडण झालं होतं. या भांडणानंतर ती चांगलीच रागावलेली होती. रागातच ती काहीच न सांगता घरातून निघून गेली. ती घरातून निघाल्यावर तिचा भाऊ लागोपाठ तिचा पाठलाग करत राहिला.
सिंह यांनी सांगितलं की, तरूणीने VIP रोडवरील तलावात उडी घेतली तर त्यानंतर मागावर आलेल्या तिच्या भावानेही तलावात तिला वाचवण्यासाठी उडी घेतली. निकिताच्या भावाला स्वीमिंग येत होतं. त्यामुळे तो तिचा जीव वाचवू शकला. त्याने तिला केसांना धरून तलावातून बाहेर काढलं. घटनास्थळी बचाव पथकही होतं. त्यानंतर हे लोकही बोट घेऊन तलावात गेले. त्यांनी दोघांनाही बाहेर काढलं.
तरूणीने अचानक तलावात उडी घेतल्याने व्हीआयपी रोडवर एकच खळबळ उडाली. ये-जा करणारे लोक आरडाओरड करू लागले होते. तिला कुणीतरी वाचवा असंही म्हणू लागले होते. त्यातीलच काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला. या व्हिडीओत निकिता तलावात बुडताना दिसत आहे. दरम्यान तिच्या भावानेही तलावात उडी घेतली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी निकिताला हमीदिया हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलीस अधिकारी निकिताचा जबाब घेत आहे. परिवारात कशावरून भांडण झालं, भावासोबत काही वाद झाला का? याचा तपास पोलीस करत आहेत. तिच्या जबाबानंतरच या गोष्टी समोर येतील.