साप किंवा अजगराचं नाव जरी काढलं तरी भीतीने थरकाप उडतो. सोशल मीडियावर सापाचे, नागाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एका महाकाय अॅनाकोंडा नदी पार करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लाखो लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे. हा नेमका कोणता साप आहे आणि खरंच अॅनाकोंडा आहे का यावरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यानं दिलेल्या कॅप्शननुसार हा अॅनाकोंडा 50 फूटाहून अधिक लांब आहे आणि तो नदी अगदी सहजपणे पार करून जात आहे. पण हा व्हिडीओ खरा आहे की? यााबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होते. आज आम्ही तुम्हाला याचे व्हिडीओ मागचं खरं कारण सांगणार आहोत.मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ 7 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक भलामोठा अॅनाकोंडा नदीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जात आहे. कौतुकास्पद! शिल्पकारानं बनवला ४० तास तेवत राहणारा मातीचा दिवा, अन् मिळवला राष्ट्रीय पुरस्कार
या अॅनाकोंडाची लांबी 50 फुट किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात होते. फॅक्ट-चेकिंग वेबसाइट दॅट्स नॉनसेंसने दिलेल्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे जो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पर "जायंट एनाकोंडा क्रॉसिंग द रोड" या अंतर्गत हा व्हिडीओ ठिकाणाचे नाव न देता अपलोड करण्यात आला होता. या व्हिडीओला इफेक्ट देण्यात आल्याचा दावा काही युझर्सनी केला आहे. सापाला मोठं दाखवण्यासाठी या व्हिडीओमध्ये बदल करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. Video : ४ वर्षांच्या चिमुरडीने गायलं वंदे मातरम; PM मोदींनीही घेतली दखल, म्हणाले......