चीनमध्ये घडलेल्या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येकजण हैराण आहे. एवढचं नाहीर व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. चीनमधील मॅशन शहरामध्ये एका महिलेला एकाचे वेळी दोनदा अपघाताचा सामना करावा लागला.
महिला आपल्या स्कूटरवरून जात असताना हा अपघात झाला. त्यावेळी महिला रस्त्यावर पडली. ती स्वतःला सावरून उठणार तेवढ्यात तिच्यावरून एक एसयूव्ही गाडी गेली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, महिला स्कूटर चालवत होती. तेव्हा अचानक समोरून टॅक्सी आली आणि तिला येऊन ठोकली.
अपघात झाल्यानंतर महिला रस्त्यावर पडली. काही सेकंदातच एक एसयूव्ही गाडी आली आणि महिलेच्या अंगावरून गेली. तेवढ्यात आजूबाजूच्या लोकांनी ड्रायवरला गाडी थांबण्यास सांगितलं. त्यानंतर लोकांनी एकत्र येऊन एसयूव्ही गाडी उचलली आणि महिलेला बाहेर काढलं.
CGTN ने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 11 हजारपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. वृत्तानुसार, दोन वेळा अपघात झाल्यानंतरही महिला ठिक आहे. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
एका यूजरने लिहिलं आहे की, महिलेचा अपघात झाला असूनही आजूबाजूच्या लोकांनी तिच्याकडे दुर्लक्षं केलं. त्यावेळी त्या महिलेची मदत केली नाही. कदाचित ही लोकं दुसऱ्यांदा तिच्यावरून गाडी जाण्याची वाट पाहत होती.'