साप भलेही दिसायला वाघ आणि हत्तीपेक्षा लहान असेल. पण सापाला बघू भल्याभल्यांची झोप उडते. कारण याचं विष, जे मनुष्याला काही सेकंदात मारू शकतं. अशात जास्तीत जास्त लोक सापांपासून दूर राहण्यातच भलाई समजतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती एका खतरनाक सापाला ग्लासातून पाणी पाजतोय.
व्हिडीओत बघू शकता की, सापाच्या प्रजातीपैकी जगातल्या सर्वात खतरनाक प्रजातीपैकी एका नेक स्पिटिंग कोब्रा. सापाने आधी ग्लासातील पाणी जिभेनं चाखलं त्यानंतर तो आरामात पाणी पिऊ लागतो. मजेदार बाब म्हणजे साप पाण्याचा ग्लास घेऊन असलेल्या व्यक्तीला कोणतंही नुकसान पोहोचवत नाही. उलट आरामात ग्लासमध्ये तोंड टाकून पाणी पितो.
हा व्हिडीओ royal_pythons_ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केल आहे. एक व्यक्ती पाण्याचा ग्लास घेऊन येतो. तिथे समोरच एक काळा नाग आहे. तो आधी जिभेने ग्लासमधील पाणी टेस्ट करतो. त्यानंतर तो आरामात ग्लासमध्ये तोंड घालून पाणी पितो. हा फारच खतरनाक प्रजातीचा साप आहे. पण पाणी पिताना तो कुणावरही हल्ला करत नाही.
या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे की, हा फारच अद्भुत नजारा आहे. तहानलेला ब्लॅक स्पिटिंग कोब्रा पाणी पित आहे. सापाचा पाणी पितानाचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.