सोशल मीडियात एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला असून हा व्हिडीओ आयएफएस रमेश पांडे यांनी शेअर केलाय. त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले की, 'नाव नसलेले ग्रीन हिरोज फिल्डमध्ये असे गुपचूप काम करतात. एक हरिण गंगा बेराजमध्ये अडकलं होतं. त्याला हैदपूरचे फॉरेस्टर मोहन यादव यांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवलं'.
हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यातील व्यक्तीचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला 7.7 हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले तर 557 पेक्षा अधिक लाइक्स मिळाले. यात तुम्ही बघू शकता की, एक वृद्ध फॉरेस्ट ऑफिसर दोरीच्या मदतीने गंगेत उतरले. पाणी फारच गढूळ आहे आणि वाहतं आहे. त्यात एक हरिण फसलं आहे. ते पाण्यात उतरतात आणि हरणाला कसंतरी जवळ खेचतात. त्यानंतर दोराच्या मदतीने हरणाला वर काढलं जातं.
काही दिवसांपूर्वी अशाच एक नदीत वाहून जात असलेल्या हरणाचा जीव एका भारतीय जवानाने वाचवला होता. भारतीय जवानाने पूर आलेल्या नदीत उडी घेऊन हरणाला बाहेर काढले होते. या जवानाचंही सोशल मीडियात भरभरून कौतुक करण्यात आलं होतं.
दरम्यान आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. एका बकरीला वाचवण्यासाठी काही युवकांची धडपड व्हिडीओत पाहायला मिळते. त्या बकरीसाठी एक युवक स्वतःच्या जीवाची बाजी लावताना दिसत आहे. दक्षिण भारतातील हे ठिकाण असावे. त्यांच्या बोली भाषेतून किमान तसा अंदाज बांधता येत आहे. एका बोरवेल किंवा तत्सम खड्ड्यात बकरी पडली आहे. तिला वाचवण्यासाठी चार युवक एकत्र आले असून एक युवक चक्क डोक्याच्या दिशेनं त्या खड्ड्यात गेला. अन्य दोन युवकांनी त्याचे दोन्ही पाय धरलेले आहेत. पाच-सहा फुटांचा हा खड्डा असावा.
कडक भावा; बकरीला वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी, जपली माणुसकी!
Viral Video : बघा हरणाच्या चलाखीसमोर सिंहाचा झाला 'पोपट', कंट्रोल नसेल तर पॉवरचा काय फायदा!