सोशल मीडियावर नेहमीच व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओज असे असतात जे पाहून हसू आवरलं जात नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाईव्ह कार्यक्रम किंवा रिपोर्टिंग सुरू असतान गोंधळ उडणं काही नवीन नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता महिला रिपोर्टर लाईव्ह रिपोर्टिंग करताना कुत्र्याच्या मागे धावायला लागली आहे. कारण या कुत्र्यानं तिच्या हातातील माईक खेचला आणि पळाला आहे.
ही घटना रशियातील असल्याची माहिती समोर येत आहे. एका पत्रकारानं हा व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे. दरम्यान रशियाच्या मॉस्को शहरातील महिला रिपोर्टर बाहेरच्या वातावरणत रिपोर्टिंग करत होती. त्याचवेळी एक कुत्रा आला आणि त्यानं या रिपोर्टरची फजिती केली. तिच्या हातातला माईक कुत्र्यानं खेचल्यानंतर तीसुद्धा त्याच्या मागे वेगानं पळत पळत गेली आणि माईक खेचून आण्ण्याचा प्रयत्न केला. काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS म्हणाले....
कसाबसा रिपोर्टरनं कुत्र्याच्या तोंडातून माईक सोडवला आणि पुन्हा आपल्या हातात घेतला. ही संपूर्ण घटना लाईव्ह रिपोर्टिंग सुरू असताना घडते. हा व्हिडीओ MNP 24 चॅनलचा आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून ९४ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. आजार राहूदे पण इंजेक्शन आवर! लस घेताना आजींनी दिली भयानक रिएक्शन, पाहा व्हिडीओ