जर शरीराचा कोणताही अवयव काम करेनासा झाला तर अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शरीराचा एखादा अवयव गमावावा लागला तर माणसांकडे त्यांचे कुटूंबिय, नातेवाईक सांभाळण्यासाठी, आधार देण्यासाठी असतात. पण प्राण्यांना मात्र अशा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला तर खूप गैरसोय होऊ शकते. कारण स्वतः फिरल्याशिवाय, रानावनात भटकल्याशिवाय यांना जेवण मिळत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला लक्षात येईल की, जगात अजूनही माणूसकी शिल्लक आहे. हा व्हिडीओ पाहून लोक भावनिक झाले आहेत.
सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आईएएस सुप्रिया साहू यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. एका माणसाकडून या हत्तीचे जीवन अधिकाधिक चांगले बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पाय तुटल्यामुळे या हत्तीला अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून हे गृहस्थ हत्तीची काळजी घेत आहे. सोशल मीडिया युजर्सनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत ३ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले असून ६६ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
याला म्हणतात नशीब! घरावर कोसळला दगड अन् काही मिनिटांत करोडपती झाला ना राव...
गेल्या दोन दिवसांपासून एका हत्तीच्या पिल्लाचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही हसायला येईल. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता हत्तीचं पिल्लू ऊसाच्या शेतात उभा राहून लपण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा या हत्तीच्या पिल्लाला कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली त्यावेळी त्याने वीजेच्या खांबाआड लपण्याचा प्रयत्न केला आहे. थायलँडच्या चिंगमई भागातील हे दृश्य असल्याचे समोर आले आहे. खांबाच्या आड लपल्यास आपल्याला कोणीही पाहू शकणार नाही. असं या हत्तीच्या पिल्लाला वाटत आहे. धोका वाढला! गंगेनंतर आता सिंधू नदीत सापडला अमेरिकेतील मासा; तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त