लोक लॉकडाऊनमुळे घरातच आहेत. त्यामुळे लोक वेगवेगळे चॅलेन्जेस घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच ऑलम्पिक चॅम्पियन सिमोन बाइल्सने एक चॅलेन्ज पूर्ण केलं. तिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरलही झाला होता. तिनेही लोकांना Handstand Challenge दिलं होतं. यात उलटं होऊन पॅंट काढायची होती. याच धरतीवर एक महिला एक व्हिडीओ करत होती. पण मधेच कुत्र्याने येऊन सगळा व्हिडीओ बिघडून टाकला.
या व्हिडीओत एक महिला हॅंडस्टॅड करत होती. तिच्या शेजारी एक वृद्ध व्यक्ती पेपर वाचत आहे. अचानक दोघांच्या मधे एक कुत्रा येतो आणि व्हिडीओची पोलखोल होते.
म्हणजे या व्हिडीओत एक महिला फेक हॅंडस्टॅन्ड करत होती. ती जमिनीवर लेटूनच हे सगळं करत होती. हा सगळा कमाल कॅमेराचा होता. यावर अनेकांच्या मजेदार कमेंटही येत आहेत.
हा झाला गमतीचा भाग. पण जर तुम्ही एखादं चॅलेन्ज पूर्ण करत असाल तर योग्य ती काळजी घेऊन करा. कारण अनेकदा अशा चॅलेन्जच्या मागे लागणं महागातही पडू शकतं.