सामान्यपणे आपण नेहमीच 'मानवता' हा शब्द मनुष्यांसाठी प्रयोग करतो. पण अनेकदा प्राणीही असं काही करतात की, त्यांना बघूनही हेच वाटतं की, त्यांच्यातही माणूसकी आहे. जेव्हाही कुणी अडचणीत असतं तेव्हा आपण त्यांच्या मदतीसाठी समोर येतो. असंच काम सर्वात प्रामाणिक मानले जाणारे कुत्रेही करतात. सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक कुत्रा एका लहान मुलीला पाण्यात बुडताना पाहून तिला वाचवतो.
समुद्र किनारी एक लहान मुलगी पाण्यात खेळत असते. तिच्या बाजूला तिचा कुत्राही आहे. अशात समुद्राची एक मोठी लाट जोरात किनाऱ्यावर येते आणि त्यात लहान मुलगी बुडताना दिसते. तेव्हाच कुत्रा तिला बुडताना पाहून बाहेर खेचू लागतो. त्याला वाटतं की, मुलगी पाण्यात बुडेल. तो तिचं टी-शर्ट तोंडात धरून तिला बाहेर खेचतो. आणि तिला सुरक्षित ठिकाणी नेतो.
काही सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना फारच आवडलाय. हा व्हिडीओ @buitengebieden_ नावाच्या ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'नॅनी बॉय'. या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २० हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि २ हजारांपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत.