जगभरात अनेक अजब गोष्टी बघायला मिळतात. सोशल मीडियावर तर अशा गोष्टींचे शेकडो व्हिडओ उपलब्ध आहेत. जे बघून कधी कधी विश्वासही बसत नाही. कारण अशा गोष्टी याआधी कधी पाहिलेल्या नसतात. काही व्हिडीओ तर असे असतात की, ते बघून लोक चक्रावून जातात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात पाण्याचा बुडबुडा कशाप्रकारे गोठतो हे बघायला मिळतं.
सोशल मीडियावर(Social Media) नेहमीच अशा गोष्टी बघायला मिळतात ज्यात आपण काहीतरी वेगळं बघत असतो आणि आपल्याला शिकायला मिळतं. पाण्याचा बुडबुडा गोठतानाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला असंच काहीसं वाटेल. पाण्याचा बुडबुडा कशाप्रकारे हळूहळू बर्फात बदलतो हे बघायला मजा येईल. हा बुडबुडा हळूहळू बर्फ बनतो आणि अचानक फुटतो. (हे पण बघा : कार पार्क करताना घामाघूम झाली तरूणी, शेवटी झालं असं काही - व्हिडीओने घातला धुमाकूळ!)
ट्विटर Nature & Animals नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'एक बुडबुडा गोठतो तेव्हा असा होतो'. सोशल मीडियावरील लोकांना हा व्हिडीओ फारच आवडतो आहे. लोका हा व्हिडीओ केवळ शेअरच करत नाहीये तर त्यावर कमेंट आणि रिअॅक्शनही देत आहेत. ३३ सेकंदाच्या या व्हिडीओ क्लिपला आतापर्यंत १.३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.