इंडियन फॉरेस्ट सर्विस ऑफिसर सुशांत नंदा यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटर एक व्हिडीओ शेअर केला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये वाघिण आपल्या बछड्यांसोबत नदीच्या किनाऱ्यावर पाणी पिताना दिसत आहे. वाघांचा हा व्हिडीओ पेंच टायगर रिजर्वमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. दरम्यान, पेंच टायगर रिजर्वमध्ये रॉयल बंगाल वाघिण 'कॉलरवाली' (Collarwali) ने जानेवारीमध्ये चार वाघांना जन्म दिला होता.
पाहा व्हिडीओ :
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वाघिण आपल्या तीन मुलांसोबत नदीच्या किनाऱ्यावर पाणी पित आहे. सुशांतने व्हिडीओ शेअर करताना वाघांबाबत एक माहिती दिली. त्यांनी लिहिलं की, 'काहीही न खाता वाघ दोन आठवडेही जिवंत राहू शकतात पण पाण्याशिवाय ते जास्तीत जास्त चार दिवस जिवंत राहू शकतात.'
सदर व्हिडीओ 7 नोव्हेंबर रोजी शेअर करण्यात आला होता. ज्याला आतापर्यंत 8 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. एक हजारपेक्षा जास्त लाइक्स आणि 2 पेक्षा जास्त रि-ट्विट्स आले आहेत.
नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया :
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेंट्रल इंडियन टायगर लँडस्केप महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि आंधप्रदेशमधील काही भागांमध्ये पसरलेलं आहे. कॉलरवाली टाइगर रिजर्वमधील सर्वात प्रसिद्ध वाघिण आहे. तिच्या नावे वर्ल्ड रेकॉर्डही आहेत. मागील 13 वर्षांमध्ये तिने 29 मुलांना जन्म दिला आहे.