वडील आपल्या मुलांसाठी सुपरहिरोपेक्षा कमी नाहीत! कारण मुलांची प्रत्येक भीती त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्यापासून दूर राहते. वडील ही अशी व्यक्ती असते जी बाहेरून काळजी दाखवत नाही, पण मनात त्यांची तुमच्याबद्दल सतत काळजी सुरू असते. परिस्थिती कशीही असो, वडिलांचा हात पाठीवर असला तर कोणतीही चिंता वाटत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तो पाहून नक्कीच तुम्ही भावूक व्हाल.
यामध्ये आपण पाहू शकतो की एक व्यक्ती स्कूटी चालवत आहे. त्यांच्या पाठीमागे तो मुलगा बसला आहे, ज्याला वाटेतच झोप लागली असावी आणि चालत्या स्कूटीवर कसलीही भीती न बाळगता झोपी गेला असावा! अशा स्थितीत मुलाचे डोके एका बाजूला पडू लागल्यावर 'वडिलांनी' त्याला डाव्या हाताने आधार दिला आणि उजव्या हाताने स्कूटी चालवत राहिले. हे स्पष्टपणे दिसून येते की मुल वडिलांचा विश्वास धरून शांतपणे झोपलेले आहे, तर वडीलही संथ गतीने पुढे जात आहेत जेणेकरून तो वेळेवर घरी पोहोचेल.
१४ नोव्हेंबर रोजी Instagram युझर abhi37920 द्वारे पोस्ट केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. काही युजर्सनी क्लिप शेअर करताना लिहिले - म्हणूनच त्याला पिता म्हणतात. जेव्हा लोकांनी हे इंस्टाग्राम रील पाहिले तेव्हा ते भावूक झाले. अनेक युझर्सनी लिहिले - मिस यू पपा. तर काही म्हणाले- वडील म्हणजे मुलांसाठी उन्हात सावली. तर आणखी एका युझरनं जोपर्यंत वडिलांचा हात डोक्यावर आहे तोपर्यंत कधीच टेन्शन नाही असं कमेंट केलंय. वडील हे प्रत्येकाच्या आयुष्याचे खरे हीरो असतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय आलं? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.