पॉवर नशी इतकी वाईट असते की, त्यात कित्येक बरबाद झालेत. सगळ्यांनाच पॉवर हवी आहे. पण काहींना फिजिकली मजबूत बनायचंय तर काहींना मेंदू मजबूत करायचाय. पण ताकद अशी गोष्टी आहे जी जेव्हा कंट्रोलच्या बाहेर होते तेव्हा तुम्हीही वेगळ्या मार्गाने जाऊ लागता. असंच काहीसं या व्हिडीओत बघायला मिळतं. पॉवर जेव्हा आऊट ऑफ कंट्रोल होते तेव्हा काय होतं ते या व्हिडीओतील सिंहाकडे बघून कळून येत.
आयएफएस सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ 13 जून रोजी ट्विटरवर शेअर केला होता. आतापर्यंत हा व्हिडीओ 1 लाख 66 हजार वेळ पाहिला गेलाय तर 12 हजारांपेक्षा जास्त याला लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका का आवडतोय? तर याचं कारण हे आहे की, यात एक जीवनाचा चांगला मेसेज आहे.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक हरिण तलावावर पाणी पित आहे. अचानक त्याच्यावर एक सिंह हल्ला करतो. पण स्पीडने आलेल्या सिंहाला हरिण असा काही चकमा देतो की, सिंहाचा 'पोपट' होतो. होतं असं की, सिंह वेगाने येतो, पण त्याला वेग कंट्रोल करता येत नाही. त्यामुळे तो बराच पुढे निघून जातो. हरिण तिथेच यूटर्न घेतं आणि उलट्या दिशेने जीव वाचवून पळत सुटतं. म्हणजे सिंहाच्या हाती काहीही लागत नाही. कारण त्याचा स्पीडवर कंट्रोल नव्हता.
गलतीसे मिस्टेक! महिलेसोबत प्रॅंक करता करता स्वत:च बनला बकरा, बघा कशी अचानक त्याची बोलती झाली बंद!
Viral Video : ...अन् त्याच्यासमोर अचानक 23 फूट लांब Anaconda आला, पुढे झालं ते पाहून फुटेल घाम!