कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील रुग्ण संख्या वाढली आहे आणि त्यामुळे अनेक राज्यांची पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले आहेत. त्यात लग्नसमारंभातली फक्त मोजक्याच व्यक्तिंना परवानगी दिली आहे. पण, यातूनही एका पठ्ठ्यांन भन्नाट मार्ग शोधून काढला. लग्न हे एकदाच होतं आणि ते दणक्यात व्हायलाच हवं, त्यासाठी चेन्नईत पठ्ठ्यानं संपूर्ण विमान बूक केलं आणि हवेत लग्न केलं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे आणि त्या त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
तामिळनाडूच्या मदुराई येथील या भन्नाट लग्नानं आता संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. लग्नासाठी या जोडप्यानं मदुराई ते बँगलोर अशा प्रवासासाठी संपूर्ण विमान बूक केलं आणि जेव्हा हे विमान मदुराई मिनाक्षी अम्मन मंदिरावरून जात होतं, तेव्हा कपलनं एकमेकांशी विवाह केला. या विमानात १६१ नातेवाईकांची उपस्थिती होती. राकेश-दक्षिणा हे दोघंही मदुराई येथे राहणारे आहेत. त्यांनी आकाशात लग्न करण्यासाठी दोन तास विमान भाड्यानं घेतलं. तामिळनाडूतील कोरोना नियमांपासून वाचण्यासाठी हा घाट घातला गेला. सर्व नातेवाईकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होते. या व्हिडीओत नवरदेव वधुला मंगळसूत्र घालताना दिसत आहेत. काही तासातच या व्हिडीओला १६ हजाराहून अधिक व्ह्यू मिळाले.
मध्यप्रदेशातही PPE किट घालून लग्न