नवी दिल्ली - स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक भाग झाला असून सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन ट्रेंड येत असतात. विविध गोष्टी या व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. स्टंटचे खतरनाक व्हिडीओ आपण नेहमीच पाहत असतो. मात्र आता एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण डोंगराच्या अगदी टोकाशी उभा राहून बॅक फ्लिप मारताना दिसत आहे.
प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनीही या तरुणाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला, या मुलांना केलेल्या स्टंटची प्रशंसा करावी की त्याला मूर्ख म्हणावं असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गायक अदनान सामी यांनीही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'एक्सपोर्ट क्वालिटीचा महा-मूर्खपणा' असं त्यांनी व्हिडीओ पाहून म्हटलं आहे. बॅक फ्लिप मारणं ही सोपी गोष्ट नाही पण या तरुणाने हा खतरनाक स्टंट अगदी सहजतेने केला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये डोंगराच्या टोकावर तरुण उभा राहिला आहे. त्यानंतर तो बॅक फ्लिप मारतो. हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये शूट करण्यात आला आहे. त्याने हा स्टंट यशस्वीरित्या पूर्ण केला खरा. मात्र लोकांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे. आतापर्यंत 63 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी तो लाईक केला आहे. गेल्या वर्षी हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये दिसत असलेला स्टंट कोणीही अजिबात करू नका. कारण हा स्टंट तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आईस्क्रिम हे सर्वांच्याच आवडीचं. आपण ते नेहमीचं खातो. पण तुम्हाला जर कोणी मांजरीने आईस्क्रिम खाल्ल्याचं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एका मनीमाऊने पहिल्यांदाच आईस्क्रिम खाल्लं आणि त्यानंतरची तिची रिअॅक्शन भन्नाट होती. एका ट्विटर युजरने मांजरीला पहिल्यांदाच आईस्क्रिम भरवतानाचा व्हि़डीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मांजर एका खुर्चीवर बसलेली आहे. तिचा मालक तिला एका चमच्याने आईस्क्रिम भरवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला ती ते नेमकं काय आहे हे पाहते आणि त्यानंतर थंडगार आईस्क्रिम तोंडात जाताच भन्नाट रिअॅक्शन देते. आईस्क्रिम खाल्ल्यानंतर ती कशी रिअॅक्ट झाली हे पाहून तुमचं हसू आवरणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक
"पंडित नेहरूंना दोष देणार्यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!"
ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला; सरकारसह खासगी क्षेत्रालाही फटका
Sushant Singh Rajput Suicide: 'सच्चा मित्र गमावला', सुशांतच्या निधनाने इस्रायल झालं भावूक
CoronaVirus News : लढ्याला यश! औषध किंवा लस नाही तर आता 'या' थेरेपीने होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार?
अलर्ट! चीनी अॅपचा वापर करताय?; बसू शकतो मोठा फटका, जाणून घ्या धोका