व्यायाम, जीमला जाणं हे सगळं तरूण लोकच करतात किंवा तरूणपणाच जमतं तुम्हाही वाटत असेल. कारण जसजसं वय वाढतं तसतसं हात पायांची शक्ती कमी होत जाते. व्यायाम तर जाऊ दे पण रोजची काम करण्यासाठी सुद्धा फारशी शक्ती अंगात उरलेली नसते. असा विचार तुम्हीसुद्धा करत असाल तर आज आम्ही तुम्हाला असा व्हिडीओ दाखवणार आहोत. जो व्हिडीओ पाहून तुमचे डोळे उघडेच राहतील. एका ९५ वर्षीय आजींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे वयाची ९० वर्ष पार केलेल्या आजी एखाद्या तरूण व्यक्तीप्रमाणे व्यायाम करताना दिसून येत आहेत.
रेक्स चॅपमन या सोशल मीडिया युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार या आजींचे वय ९५ वर्ष असून नाव जोआन्ना क्वास असं आहे. या आजी जगातील सगळ्यात वयस्कर जीमनॅस्ट आहेत.
या आजींचा व्हिडीओ आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. २०१२ मध्ये या आजींना सगळ्यात वयस्कर जिमनॅस्टचा पुरस्कार मिळाला होता. लय भारी! मराठमोळ्या जोडप्याचं अनोखं प्री-वेडिंग फोटोशूट; फुले दांपत्याबद्दल व्यक्त केला आदर
हा व्हिडीओ पाहून प्रेरणा मिळाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. इतकंच नाही आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही हा व्हिडीओ दाखवत आहेत. हा व्हिडीओ पाहून इतरांना व्यायाम करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचं लोक म्हणत आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांनी केलेल्या व्यायाम प्रकाराप्रमाणे व्यायाम कोणीही करायला जाऊ नये. कारण असे कठीण व्यायाम करण्यासाठी सरावाची आवश्यकता असते. जोआन्ना यांची मेहनत हे दाखवून देते की, त्यांना आता वाढत्या वयाचा काहीही फरक पडत नाही. न्हाव्यानं गरिबाचा सुटाबुटातला फोटो सोशल मीडियावर टाकला, अन् १० वर्षांनी कुटुंबाला पटली ओळख