सध्याच्या कॉम्प्यूटर, लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या जमान्यात टाईपरायटर फक्त नावापुरता शिल्लक राहिला आहे. पूर्वी मोठ्या मोठ्या कार्यालयीन कामासाठी वापरात असलेला टाईपरायटर आता एखाद्या कोपऱ्यात धूळ खात पडलेला असतो. तर काही ठिकाणी टाईपरायटर पूर्णपणे नाहिसा झालेला असून त्याची जागा किबोर्डने घेतली आहे. आज आम्ही तुम्हाला एका कलाकारचा भन्नाट व्हिडीओ दाखवणार आहोत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही या काकांच्या कलेला सलाम करावासा वाटेल.
तुमचा विश्वास बसणार नाही पण बँगलुरूचे रहिवासी असलेले हे गृहस्थ टाईपरायटरच्या साहाय्याने आकर्षक चित्रांची कलाकृती साकारतात. यांचे उदारहण आजच्या तरूणांसाठी एक आदर्श आहे. डॉक्टर अजायीता यांनी ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, एसी गुरूमुर्ती हे बँगलुरूचे बेस्ट कलाकार आहेत. आपल्या जुन्या टाईपरायटरचा वापर करून ते पोर्टेट चित्र तयार करतात. भारीच! औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली काश्मिर सारखी सफरचंद; २० वर्षांपर्यंत येतात फळं
यावर्षीच त्यांनी लोकांना संदेश देण्यासाठी भारतमातेचे चित्र टाईपरायटरच्या साहाय्याने तयार केले होते. या फोटोत त्रिशुळाच्या साहाय्याने देवी कोरोना व्हायरसचा खात्मा करताना दिसून येत आहे. एका रिपोर्टनुसार गेल्या ५० वर्षांपासून ते टाईपरायचरच्या साहाय्याने पोर्टेट तयार करत आहेत. ए. सी गुरूमुर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी त्यांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांना आपले नाव नोंदवायचे आहे. लय भारी! डिलिव्हरी बॉय बनून स्वप्न पूर्ण केलं, हजारोंना विकली जातेय 'त्या' नं बनवलेली सायकल