किंग कोब्रा (King Cobra Snake) पाहिल्यावरच भल्याभल्यांना घाम फुटतो. हा जगातल्या सर्वात विषारी सापांपैकी एक मानला जातो आणि याचा आकारही व्यक्तीची झोप उडवतो. त्याला पकडताना सर्पमित्रांना फारच काळजी घ्यावी लागते. कारण तो जेव्हा चिडतो तेव्हा तुमचा जीवही जाऊ शकतो. सोशल मीडियावर किंग कोब्राचा असाच एक व्हिडीओ व्हायरल (King Cobra Viiral Video) झाला आहे. हा व्हिडीओ बघून तुम्ही सर्पमित्राला सलाम कराल आणि कोब्राबाबत तुमच्या मनात आणखी भीती बसेल.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक व्यक्ती विशाल कोब्रा पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पण तेव्हाच कोब्रा संतापतो आणि तरूणावर अटॅक करायला सुरूवात करतो. तरूणही कमी हट्टी नाही. तो पुन्हा पुन्हा कोब्राला शेपटीकडून पकडतो. पण कोब्राही आपला फणा काढून त्याच्यावर हल्ला करतो. तरूण थोडक्यात बचावतो. अशात आणखी काही तरूण त्याच्या मदतीला येतात. अशात साप एकटा पडतो. शेवटी तरूण कोब्रा सापाला पकडतो. पण कोब्रा त्याच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करताना दिसतो.
हा खतरनाक व्हिडीओ @Animal_World नावाच्या ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला समजेल की, किंग कोब्राच्या ताकदीला तोड नाही. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे याची माहिती मिळू शकली नाही. प व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहे. हेही स्पष्ट झालं की, कोब्रापासून दोन हात नाही तर दहा हात दूर रहायचं.