Viral Video : खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये आणि भाज्यांमध्ये भेसळ केली जाणं ही काही नवीन बाब नाही. आजच्या जगात ओरिजनल आणि भेसळ यात फरक करणं सोपं नाहीये. सध्या ट्विटवर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका व्यक्तीने असा खुलासा केला की, कशाप्रकारे चिमलेल्या पालेभाज्यांना केमिकलमध्ये टाकून ताजं केलं जातं. हा व्हिडीओ ट्विटरवर अमित थडानी (@amitsurg) ने शेअर केला. मायक्रोब्लॉगिंग साइटवर अमित थडानीने हे सांगितलं की, ओरिजनल पोस्ट देवराजन राजगोपालनने लिंक्डइनवर पोस्ट केली होती.
ताज्या नसलेल्या भाज्या केमिकलमध्ये टाकून त्या फ्रेश करणाऱ्या हा व्हिडीओ शेअर करत देवराजन यांनी लिहिलं होतं की, दोन मिनिटांची वास्तविक जीवनाची भीतीदायक कहाणी. व्हिडिओत एक व्यक्ती खराब झालेली हिरवी पालेभाजीची गड्डी केमिकलमध्ये टाकताना दिसत आहे. त्यानंतर ती बाहेर काढतो आणि काही सेकंदात ती चिमलेली भाजी ताजी-टवटवीत होते.
या व्हिडिओवर लोक भरभरून कमेंट्स करत आहेत. एका ट्विटर यूजरने लिहिलं की, 'धक्कादायक आणि चिंताजनक. माहीत नाही आपण सगळे काय खात आहोत'. एकाने या केमिकलचा बचाव करत लिहिलं की, 'यात काही चुकीचं नाहीये. हे एक सिलिकॉन बेस्ड कम्पाउंड आहे. ज्याचा वापर कीटकनाशकांचा प्रभाव वाढवण्यासाठी केला जातो. याला ऑर्गेनिकमध्येही वापरण्याची परवानगी आहे. पण याचा वापर प्रोडक्ट्स फ्रेश दाखवण्यासाठी नाहीये'.