नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं. एम्समध्ये कोरोना लस घेतल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली आहे. अनेक नेते मंडळींनी देखील कोरोनाची लस घेतली आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर लसीकरण केंद्रावरचा एक मजेशीर व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
कोरोनाची लस घेताना काहींना भीती वाटत आहे. तर काहींनी लस घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. याच दरम्यान अनेकांनी आपले फोटो आणि व्हिडीओ हे शेअर केले आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पोलीस कर्मचारी लस घेताना खदखदून हसत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना लस घेताना त्याला हसूच आवरत नाही. आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्यामते हा व्हिडिओ नागालँडचा आहे. यामध्ये लस घेताना पोलीस कर्मचारी खूप हसताना दिसत आहे.
कोरोनाची लस घेण्यासाठी पोलीस कर्मचारी लसीकरण केंद्रावर पोहोचला मात्र नर्सने त्याला स्पर्श करताच तो जोरजोरात हसू लागला. त्यावेळी त्याला लस टोचलेली नव्हती. त्याला हसताना पाहून बाकी लोकही हसायला लागले. आयपीएस अधिकाऱ्यानं व्हिडीओ शेअर करताना नागालँडमध्ये कोरोना लसीकरण करतानाचा हा व्हिडिओ. माहीत नाही, या व्यक्तीने शेवटी लस घेतली की नाही... असं वाटतं, की त्याला खूप गुदगुल्या होत होत्या. तो सुईपेक्षा या गुदगुल्यांनी जास्त चिंतेत होता असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर अल्पावधीत हा व्हिडीओ सुपरहिट झाला असून तुफान व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Video : कोरोना लस मिळाल्याचा आनंद, भारतीय युवकानं कॅनडात गोठलेल्या तलावावर केला 'भांगडा'!
जगभरात कोरोना लसीकरणाचे कार्यक्रम सुरू आहेत. यातच कॅनडाचा डान्सर गुरदीप पंधेरने (Gurdeep Pandher) 2 मार्चला कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. यानंतर त्यांनी आपल्या वेगळ्याच अंदाजात याचा आनंद व्यक्त केला आहे. सर्वसाधारणपणे लस घेतल्यानंतर लोक आपल्या घरी जाऊन आराम करतात. मात्र, गुरदीपने असे न करता, लस घेतल्यानंतर बर्फ झालेल्या एका तलावावर भांगडा केला. हा भांगडा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर, गुरदीप यांच्या या अनोख्या अंदाजाला लोकांची जबरदस्त पसंती मिळत आहे. गुरदीपने स्वतःच ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना सांगितले, की लस घेतल्यानंतर तो थेट युकोन येथे गोठलेल्या तलावावर गेला आणि याचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्याने जबरदस्त भांगडा केला. त्यांच्या या पोस्टमध्ये 55 सेकंदांचा एक व्हिडीओ देखील आहे.