सोशल मीडियावर एका वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रात्रं दिवस, उन्हातान्हात आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य करत असतात. कामावर हजर असताना अनेक अनपेक्षित प्रसंगांना या योद्ध्यांना तोंड द्यावं लागतं. तरीही कोणत्याही कामाला कमी न लेखता सगळी काम करण्यासाठी हे कर्मचारी सेवेसाठी हजर असतात.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @Tazeen Qureshi या ट्विटर युजरने शेअर केला आहे. १७ ऑक्टोबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. कर्तव्यावर हजर असलेला वाहतूक पोलिस रस्त्यावरची धूळ झाडूने साफ करत होता. जेणेकरून कोणतेही वाहनं घसरून अपघात होऊ नये. रस्त्यावर झाडू मारण्यामागचं हे कारण माहीत झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्स भारावून गेले आहेत. आतापर्यंत २२ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून दीड हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. शेकडो लोकांनी वाहतूक पोलिसाच्या कामाचे कौतुक केले आहे. Video : 'मास्क क्यू नही लगाते?' असं विचारल्यास पठ्ठ्याने जे उत्तर दिलं ऐकून पोट धरून हसाल...
ओरिसापोस्टच्या माहितीमुसार हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी सुधांशू सारंगी यांनी वाहतूक पोलिस ललीत मोहन यांना सन्मानित केलं आहे. ललीत यांनी सांगितले की, ''रस्त्यावर पडलेली रेती आणि माती यांमुळे दुपारच्यावेळी वाहन चालकांना त्रास होतो. अनेकदा जास्त धूळ, रेतीमुळे दुर्घटनेचाही सामना करावा लागतो म्हणून मी हातात झाडू घेऊन रस्ता साफ करण्याचा निर्णय घेतला.'' अन्य पोलिसांनीही ललीत यांना हे काम करण्यासाठी मदत केली होती. वाह, नशीब चमकलं! मासेमाराच्या गळाला लागला ७५० किलोंचा दुर्मिळ 'मंटा-रे' मासा, पाहा फोटो