Viral Video : सोशल मीडियावर हल्ली कधी काय पाहाला मिळेल हे ठोस सांगता येत नाही. रेल्वेतील भांडणं तसेच बसमधील प्रवाशांचे तू-तू मैं मैं करतानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. त्यात दिल्लीमेट्रो हा विषय काही नेटकऱ्यांना नवा नाही. बऱ्याचदा दिल्लीमेट्रोतील अतरंगी आणि विचित्र पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत असतात. नुकताच दिल्ली मेट्रोतील एका इन्फ्ल्यूएन्सरचा व्हायरल व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियावर यूजर्सनी संताप व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वीच दिल्ली मेट्रोमध्ये दोन तरूणी अश्लील पद्धतीने मेट्रोच्या कोचमध्ये होळी खेळत होत्या. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला होता. काही वेळातच त्या तरूणींना पोलिसांनी अटक केली होती. त्यात हा व्हिडिओ आता अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
मेट्रोमध्ये अलीकडच्या काळात रील्स बनविणाऱ्यांचा सुळसुळाट पसरला आहे. असाच एका रील बनविणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. क्रॉप टॉप आणि स्कर्ट घालून ही तरुणी डान्स करत आहे. मात्र, तिला नाचताना पाहून मेट्रोतील प्रवासी अक्षरशः तोंड वाकडे करताना दिसत आहेत.
मेट्रोच्या महिला डब्यात ही तरूणी अचानक पाठमोरी धावत येते आणि भोजपुरी गाण्यावर 'ट्रेकिंग' प्रकारचे नृत्य करु लागते. अचानक झालेला हा प्रकार पाहून दुसऱ्या डब्यातील प्रवासी डोळे विस्फारून पाहू लागतात. मात्र, महिला डब्यातील एक महिला तिचे नृत्य पाहून नाक मुरडते आणि ही काय विचित्र प्रकार करते, अशा नजरेने पाहू लागते.
दरम्यान, चालत्या मेट्रोमध्ये ही तरूणी डान्स करताना दिसत आहे. या मेट्रोमधील इतर महिला प्रवासी या डान्सर इन्फ्ल्युएन्सकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. पण, नेटकऱ्यांनी या तरुणीला चांगलच धारेवर धरलं आहे. सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
एक्सवर #RahulAggrawal नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "अशा लोकांना लाज सुद्धा वाटत नाही, असे लोक पैशासाठी काहीही करतील" अशी खोचक कमेंट एका नेटकऱ्याने या व्हिडिओवर केली आहे. तसेच आणखी एक जण म्हणतो, "या पेक्षा घाण काही असूच शकत नाही."