Social Viral : एखादा रेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. नुकताच एका भारतीयाने यापेक्षा जरा वेगळा विक्रम केला आहे. हा विक्रम आहे हाता-पायांचा वापर न करता शरीराच्या इतर अवयवांचा वापर करून टायपिंग करण्याचा.
विनोद कुमार चौधरी असे त्यांचे नाव आहे. त्यांनी चक्क नाकाचा वापर करून टायपिंग केले आहे. गेल्यावर्षी त्यांनी २७.८० सेकंदांत इंग्रजी वर्णमाला टाइप केली. दुसऱ्यांदा त्यांनी यासाठी २६.७३ सेकंद घेतले. यावेळी त्यांनी २५.६६ सेकंदांतच वर्णमाला टाइप केली. याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे. त्यांचा नाकाने टायपिंग करण्याचा वेग पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. सध्या विनोद कुमार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या एक्स प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विनोद चौधरी आपल्या नाकाच्या साहाय्याने इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे टाईप करताना दिसत आहेत. शिवाय जीडब्ल्यूआरने या व्हिडिओच्या माध्यमातून नेटकऱ्यांना एक प्रश्न देखील विचारला आहे. आपल्या नाकाच्या मदतीने तुम्ही किती स्पीडने अक्षरे टाईप करू शकता?
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसोबत संवाद साधताना विनोद म्हणाले, "माझा पेशा टायपिंग करणं आहे. त्यामुळेच मी नव-नवीन रेकॉर्डस बनवायची माझी इच्छा आहे. ज्याच्या माध्यमातून माझी आवड आणि उदरनिर्वाह देखील होईल. माझं असं म्हणणं की आयुष्यात कितीही संकटे आली तरी खचून न जाता आपली आवड जपा. त्याचबरोबर ते, म्हणाले, सध्या 'टायपिंग मॅन ऑफ इंडिया' या नावाने लोक मला ओळखतात आणि हा किताब जिंकण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहे. नाकाने टायपिंग करत असताना बऱ्याचदा मला चक्कर देखील येते डोळ्यांभोवती अंधार येतो", असा खुलासा देखील त्यांनी केला.
या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनी कमेंट्स करत विनोद चौधरी यांचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ पाहून "Very Nice Brother" अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे तर त्यावर आणखी एक जण म्हणतो, "My friend could of done this..." अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.