काही वेळा असे वाटते की वय तुम्हाला काही गोष्टी करण्यापासून रोखू शकत नाही. Age is just a Number - ही इंग्रजी म्हण याचाच प्रत्यय देत असते. अनेकदा या म्हणीचा प्रत्यय येणाऱ्या घटना घडतात. जीवनात कोणतेही ध्येय साध्य करण्याची इच्छाशक्ती असेल तर वयाचा कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
वयोवृद्ध लोक त्यांचा आवडता छंद जतन करताना काही आश्चर्यकारक गोष्टी करताना दिसतात. म्हातारपणातही ते युवा पिढीला लाजवतील असे कारनामे करून दाखवतात. एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वृद्ध महिला तामिळनाडूच्या कल्लीडायकुरीची शहरात थमिरबरानी नदीच्या पाण्यात डुबकी मारताना दिसते. या व्हिडिओ क्लिपने सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या वयोवृद्ध महिलेकडून प्रेरणा मिळाल्याशिवाय तुम्हालाही राहणार नाही. पाहा व्हिडीओ-
IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओतील वृद्ध महिला प्रोफेशनल डायव्हर्सनाही थक्क होण्यास नक्कीच भाग पाडले. साहू यांनी आपल्या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, "तमिळनाडूतील कल्लीडायकुरिची येथील तामीराबाराणी नदीत सहजतेने डुबकी मारताना या साडी नेसलेल्या वृद्ध महिलांना पाहून आश्चर्यचकित झाले. मला सांगण्यात आले आहे की ते त्यात मास्टर आहेत. याचे कारण ते या गोष्टी नित्यक्रमाने करत आहे. प्रेरणादायी व्हिडिओ."
दरम्यान, ही व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स मात्र चक्रावून गेले आहेत. तर काही युजर्स या महिलांची स्तुती करताना दिसत आहेत.