Mask Lollypop Jugaad Viral Video: गेल्या दोन वर्षात कोरोनाने संपूर्ण जगाला वेढलं आहे. करोडो लोकांना याचा संसर्ग झाला आणि लाखो लोकांचा बळी गेला. कोरोना येण्याआधी मास्क, सॅनिटायझर इत्यादी गोष्टींची माहिती फार कमी लोकांना होती. त्याचा वापर करणारे तर खूपच कमी होते. पण आता कोरोनामुळे लहान लहान मुलेही मास्क घालून रस्त्यावर फिरतात. कोरोनापासून वाचता यावं यासाठी ते गरजेचंच आहे. अशाच एका लहान मुलाचा मास्क अन् लॉलिपॉपचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलोय. सोशल मीडियावर नेहमीच सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असले, तरी आज काल मास्कशी संबंधीचे व्हिडीओ जरा जास्तच व्हायरल होतात. हा व्हिडिओही मास्क संबंधित असून तो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही.
या व्हिडिओमध्ये एक मुलगा लॉलीपॉप खाण्यासाठी अप्रतिम शक्कल लढवताना दिसतो. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालावा लागत असल्याने तो मास्क तोंडावरून काढू शकत नाही. पण त्याला लॉलीपॉपही खायचं असल्याने नक्की काय करावं याचा तो विचार करतो अन् त्यानंतर एक भन्नाट जुगाड करतो. तो लहान मुलगा थेट लॉलीपॉपच्या काठीने मास्कच्या आतल्या बाजूला एक छोटं भोक पाडतो आणि आरामात मास्क घालून लॉलीपॉप खाऊ लागतो. पाहा Video-
--
अशी अद्भूत कल्पना शोधून काढणारी मुलं सध्याच्या युगात बरेचदा पाहायला मिळतात. हल्लीची मुलं आपल्या बुद्धिमत्तेचा असा काही वापर करतात की बघणारेही थक्क होतात. अनेक युजर्सनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या १५ सेकंदांच्या या व्हिडिओला लोक भरपूर पसंत करत आहेत.