School Kid Singing Gulabi Aankhen Jo Teri Dekhi Viral Video: हल्लीची पिढी ही जन्मत:च हुशार असते असं अनेकांचं म्हणणं असतं. काही प्रमाणात हे खरंही आहेच. कारण आजकाल लहानपणापासूनच मुलं आपले अंगचे कलागुण न लाजता दाखवू लागतात. काही वेळा तर मुलांच्या कला पाहून मोठ्यांनाही त्यांचा हेवा वाटतो. लहान मुलांमध्ये सहसा गायन आणि नृत्य याबद्दल विशेष प्रेम आणि आवड असल्याचं दिसतं. अगदी तीन-चार वर्षाची मुलंदेखील गहन अर्थ असलेली गाणी सहज गुणगुणताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना कविता शिकवल्या जायच्या आणि त्या पाठ करून यायला सांगितलं जायचं. पण पूर्वी काही मुलांना कवितेच्या काही ओळी आठवच्या नाहीत. हल्ली मात्र परिस्थिती काही वेगळीच आहे. आजकालच्या मुलांना बॉलिवूडमधली संपूर्ण गाणीच्या गाणी लक्षात असतात. अशाच एका चिमुरड्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय. 'गुलाबी आँखे जो तेरी देखी...' हे गाणं तो थेट वर्गातल्या मॅडमसमोर गातोय.
व्हिडिओमधला मुलगा हा जेमतेम चार वर्षांचा असला तरी तो 'गुलाबी आंखे जो तेरी देखी' हे महान गायक रफीने गायलेलं गाणं गाताना दिसतोय. त्यातही विशेष म्हणजे त्याने ते गाणं खूप सुंदर गायलंय. त्या चिमुरड्याला गाण्याचे बोल नीट लक्षात असून त्याचा आवाजही गोड आहे. त्याचं गाणं ऐकल्यावर कोणीही त्या मुलाच्या प्रेमातच पडेल. त्यातही व्हिडीओतील विशेष बाब म्हणजे, त्या मुलाची शिक्षिकाच त्याला गाणं गायलं सांगत्येय. आणि मुलगाही झकासपैकी गाणं गातोय. पाहा तो व्हिडीओ-
IAS अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'शाळा उघडल्यानंतरचा पहिला दिवस'. अवघ्या काही मिनिटांतच हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. ६० हजारांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला असून ५ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केलंय. अनेकांनी तर कमेंट करून मुलाच्या आवाजचं आणि गायनाचं कौतुकही केलं आहे.