Rhino attack Viral Video: पृथ्वीवर विविध प्रकारचे प्राणी राहतात. पण त्यामध्ये हत्ती सर्वात मोठा प्राणी आहे. तसेच, गेंडा हादेखील एक भयावह प्राणी असतो. गेंडा हा हत्तीनंतर या पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि वजनदार प्राणी आहे. लोक हत्ती कसेही पाळतात, पण गेंडा हा पाळीव प्राणी नाही. गेंडा जंगलात राहणारा प्राणी आहे. काही ठिकाणी अभयारण्यात किंवा प्राणी संग्रहालयात गेंडे अनेकदा दिसतात, पण एखादा गेंडा रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसला तर? असाच एक प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक गेंडा रस्त्यावर मुक्तपणे धावताना दिसत आहे. गेंडा सहसा धावताना पाहिला नसला तरी या व्हिडिओने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हलका पाऊस पडत आहे आणि अनेक वाहने रस्त्यावर थांबली आहेत. दरम्यान, एक महाकाय गेंडा रस्त्यावर धावताना दिसतो मात्र, तो कोणत्याही वाहनाला धडक देत नाही. त्याच्या धुंदीत तो धावत कारच्या बाजूने निघून जातो. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, रस्त्यावर उघड्यावर गेंडा पाहून लोकांना धक्का बसला. साधारणपणे हे प्राणी जंगलातच दिसतात, पण इथे ते मानवी वस्तीमध्ये फिरताना दिसले. हा व्हिडीओ नक्की कोणत्या ठिकाणचा आहे हे माहीत नाही, पण लोक गेंड्याला पाहून नक्कीच आश्चर्यचकित होतात असे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.