Viral Video : राजस्थानमधील अमित शर्मा फेमस यूट्यूबर आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलला 28 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. तो चॅनलवर नेहमीच वेगळे आणि चॅलेंजिंग व्हिडीओ शेअर करत असतो. दिवाळी तोंडावर आली आहे. अशात त्याने फटाक्यांसोबत हैराण करणारा प्रयोग केला. त्याने एकत्र 1 हजारांपेक्षा जास्त रॉकेट एकाचवेळी फोडले. पण रॉकेट आकाशाकडे नाही तर जमिनीवर सोडण्यात आले. त्यानंतर जो नजारा दिसला तो हैराण करणारा होता.
अमित शर्माच्या व्हिडिओला यूट्यूबवर 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हजारो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. पण काही लोकांनी त्याला असे प्रयोग न करण्याचीही विनंती केली आहे. मात्र, हा प्रयोग काळजीपूर्वक करण्यात आला. हा प्रयोग रात्री एका मोठ्या जागेवर करण्यात आला.
व्हिडिओत अमितने आधी दाखवलं की, तो 200 रॉकेट जमिनीवर ठेवून कसे उडवणार? त्याच्या मदतीसाठी त्याच्यासोबत बरेच लोक होते. त्याने जमिनीवर शेकडो रॉकेट लाइनने ठेवले. जेव्हा हे पेटवले तेव्हा जे दिवसं ते अवाक् करणारं होतं. सगळीकडे फक्त प्रकाश दिसत होता.
त्यानंतर त्याने हजार रॉकेट पेटवले. हाही नजारा थक्क करणारा होता. अमित आणि त्याची टीम कारमध्ये जाऊन बसली. त्यानंतर रॉकेटचा धुमाकूळ सुरू झाला. अंधारात हे फारच सुंदर दिसत होतं.