ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे नजरेचा धोका. या व्हिडीओत तुम्हाला अशीच एक वस्तू बघायला मिळते. जी जपानचे गणितज्ज्ञ आणि मूर्तिकार Kokichi Sugihara यांनी तयार केली असून इंटरनेटवर या व्हिडीओने अनेकांचं डोकं चक्रावून गेलं आहे. सिंगापूरचे आर्ट डिरेक्टर थाम काई मेंग यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक थ्रीडी अॅरो म्हणजे बाण आहे. असा दावा केला जात आहे की, हा अॅरो कसाही फिरवा तो उजव्या बाजूनेच राहिल.
थाम काई मेंग यांनी हा व्हिडीओ शेअर करत हे असं का होतं याचाही खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, हा अॅरो थ्रीडी प्रिंटेड आहे. त्यावर खूपसारे फोल्ड आहेत. जे आपला मेंदू रजिस्टर करू शकत नाही.
व्हिडीओत आपण बघू शकतो की, अॅरोला १८० डिग्रीवर फिरवल्यावरही तो उजव्या बाजूनेच पॉइंट करतो. झालं याच कारणाने हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ४ ऑगस्टला पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून आतार्यंत २.६६ मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर ९५.३ के लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय.
या व्हिडीओवर सोशल मीडियातून लोकांच्या मजेदार कमेंट्सही येत आहेत.