सापाचं नाव काढलं तरी अनेकांचा थरकाप होतो. व्हिडीओ, फोटोमध्ये साप पाहायला काही वाटत नाही. पण प्रत्यक्षात जेव्हा साप किंवा अजगराशी सामना करावा लागतो तेव्हा मात्र बोबडी वळते. सध्या सोशल मीडियावर कारच्या बोनेटवर अजगर बसल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ अमेरिकेतील फ्लोरिडामधील डेनिया बीच येथील आहे.
निळ्या रंगाच्या फोर्ड कारच्या बोनेटच्या आत १० फूटांचा अजगर बसलेला तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. ही गाडी पार्किंगमध्ये उभी असताना हा प्रकार घडला. या कारचा मालक त्या ठिकाणी आला आणि त्याने गाडी सुरू केली. त्याचवेळी त्याला इंजिनमध्ये काहीतरी अडचण असल्याचे जाणवले. गाडी लवकर सुरू होत नव्हती म्हणून त्याने बोटेन उघडून पाहिले तर धक्काच बसला. कारण बोनेट उघडल्या उघडल्या समोर दिसला भलामोठा अजगर. काय सांगता? भिकारी महिलेच्या अकाऊंटमध्ये सापडले तब्बल दीड कोटी रुपये, अन् मग.....
बोनेटमध्ये १० फूट लांबीचा अजगर वेटोळे करून बसला होता. त्याला बोनेटमधून काढायचं कसं हे कळायला मार्ग नव्हता. वन्यजीव कर्मचाऱ्यांनी या अजगराला पकडून काढण्याचा प्रयत्न केला. या अजगरानं वेटोळं घालून त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. अजगर हल्ला करण्याच्या तयारीतच होता. पण लगेचच वन्यजीव अधिकाऱ्यानं त्याला पकडलं आणि बाहेर काढलं. या घटनेमुळे कारचा मालक चांगलाच घाबरला होता. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. बापरे! नदीत पोहोताना दिसला तब्बल ५० फुटांचा अॅनाकोंडा; वाचा व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य
नदीत पोहोताना दिसला तब्बल ५० फुटांचा अॅनाकोंडा
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ 7 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक भलामोठा अॅनाकोंडा नदीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जात आहे. या अॅनाकोंडाची लांबी 50 फुट किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात होते. फॅक्ट-चेकिंग वेबसाइट दॅट्स नॉनसेंसने दिलेल्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे जो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. "जायंट एनाकोंडा क्रॉसिंग द रोड" या अंतर्गत हा व्हिडीओ ठिकाणाचे नाव न देता अपलोड करण्यात आला होता. सापाला मोठं दाखवण्यासाठी या व्हिडीओमध्ये बदल करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला होता.