Viral Video : भारतात गेल्या काही वर्षात स्वच्छतेवर खूप भर दिला जात आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. सार्वजनिक शौचालय किंवा स्वच्छता गृहांचं निर्माण मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. पण या टॉयलेट्सची एक समस्या म्हणजे हे खूप घाणेरडे असतात. त्यांच्या स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात नाही. पण तेच दुसऱ्या देशांमध्ये पब्लिक टॉयलेटच्या स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते. सध्या फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील एका पब्लिक टॉयलेटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे टॉयलेट आपोआप स्वच्छ होतं.
ट्विटर अकाउंट @HowThingsWork_ वर असे अनोखे व्हिडीओ नेहमीच शेअर केले जातात. नुकताच एक अवाक् करणारा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात एक पब्लिक टॉयलेट आपोआप स्वच्छ होताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, टॉयलेट फंक्शन दाखवण्यासाठी आत एक कॅमेरा लावण्यात आला आहे. दरवाजा आपोआप बंद होतो आणि कमोडही आत जातं. मग फरशीमधून पाणी निघू लागतं. फरशी चांगली स्वच्छ होते. काही वेळाने फरशीखाली असलेल्या मशीनने फरशी कोरडी होते. कमोड बाहेर येतं आणि दरवाजा उघडतो.
या व्हिडीओला 1 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांना यावर सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. तर काही लोकांनी काही निगेटीव्ह कमेंट्सही केल्या आहेत.