सोशल मीडियावर एक महिलांच्या फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना आहे अमेरिकेतील एरिजोनाच्या स्कॉट्सडेलची. इथे ६ मार्चला फॅशन स्क्वायर मॉलमध्ये लाइन तोडण्यावरून कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही संपूर्ण घटना कमेरात कैद झाली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. रिपोर्ट्सनुसार दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
एका ट्विटर पोस्टनुसार, कर्मचारी आणि ग्राहक स्क्वायर मॉलच्या बाथ अॅन्ड बॉडी वर्क्समध्ये भांडण झालं. ट्विटर यूजरने लिहिले की, एका महिला दुसऱ्या ग्राहकाच्या फार जवळ उभी होती. अचानक दोघांमध्ये मारझोड सुरू झाली. स्टोरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण प्रकरण आणखीनच बिघडलं.
या १ मिनिट ५ सेकंदाच्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे कर्मचारी आणि ग्राहक एकमेकांशी भिडले. दोन महिलांच्या उडीत नंतर आणखी महिला आल्या आणि हे भांडण आणखी वाढलं. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि १ कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सोबत लोक आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.