शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Video - जेवताना तरुणाची झाली भयंकर अवस्था; वेटरने चमत्कार केला अन् जीव वाचवला, केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 4:16 PM

Viral Video : रेस्टॉरंटमध्ये आलेल्या एका व्यक्तीच्या घशामध्ये अन्नाचा तुकडा अडकला. यानंतर काहीच वेळात तो बेशुद्ध झाला. यानंतर जे काही घडलं ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं.

जेवताना अनेक वेळा अचानक ठसका लागतो, अन्नाचा कण श्वासनलिकेत अडकतो. अशावेळी आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. अशी घटना काही वेळा जीवावर देखील बेतू शकते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ब्राझीलच्या साओ पाओला येथे ही धक्कादायक घटना आहे. रेस्टॉरंटमध्ये आलेल्या एका व्यक्तीच्या घशामध्ये अन्नाचा तुकडा अडकला. यानंतर काहीच वेळात तो बेशुद्ध झाला. यानंतर जे काही घडलं ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या एका व्यक्तीच्या घशात जेवण करत असतानाच अन्नाचा तुकडा अडकतो. यामुळे त्याला त्रास होऊ लागतो. यानंतर काहीच वेळात तो बेशुद्ध होऊन टेबलवर पडतो हे पाहायला मिळत आगेत. तसेच यानंतर मागे बसलेल्या महिलेला हे जाणवताच ती या व्यक्तीच्या जवळ येते. यादरम्यान इतरही लोक तिथे जमा होतात. सर्व या व्यक्तीला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात. मात्र हा व्यक्ती काहीच हालचाल करत नाही. 

वेटरचं सर्वत्र कौतुक, व्हिडीओ जोरदार व्हायरल

रेस्टॉरंटमधील लोक वेटरला बोलवतात. यानंतर वेटर जे काही करतो ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.  वेटर या व्यक्तीला मागील बाजूने पकडून जोरजोरात उठवतो आणि धक्के देतो. यानंतर एक पोलीसही तिथे येऊन वेटरची मदत करतो. यानंतर या व्यक्तीच्या गळ्यात अडकलेला तुकडा बाहेर पडतो आणि तो श्वास घेऊ लागतो. वेटर आणि पोलीस मिळून या व्यक्तीचा जीव वाचवतात. घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या वेटरचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. हा व्हिडिओ GoodNewsCorrespondent नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 

"सुदैवाने वेटर वेळेवर आला आणि व्यक्तीचा जीव वाचवला"

एका दिवसाआधी शेअर झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 30 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर 900 हून अधिकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, सुदैवाने वेटरने वेळेवर येत या व्यक्तीचा जीव वाचवला. अशा लोकांना सलाम, तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, वेटरचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तर आणखी एकाने म्हटलं की असे लोकच खरे हिरो आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Brazilब्राझीलSocial Viralसोशल व्हायरल