Snake Viral Video : अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये एका व्यक्तीने एका सापाचा दुसऱ्या सापाला गिळतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. या व्हिडीओत बघू शकता की, एक विषारी टिंबर रेटलस्नेकला एक किंगस्नेक गिळत आहे. 80 वर्षीय टॉम स्लॅग यांनी हे दृश्य पाहिलं आणि लगेच कॅमेरात कैद केलं. जॉर्जियाला राहणारे टॉम यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात एक खतरनाक साप आपल्यापेक्षा आकाराने मोठ्या सापाला गिळत आहे. हा व्हिडीओ जॉर्जिया डिपार्टमेंट ऑफ नॅच्युरल सोर्सेसकडून शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओ शेअर करताना DNR ने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'किंगस्नेक विरूद्ध टिंबर रॅटलस्नेक - ही साप खाणाऱ्या सापांची दुनिया आहे'. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, साप आपला जबडा रॅटलस्नेकच्या शरीराच्या चारही बाजूने फिरवतो आणि मग पूर्णपणे गिळतो. रॅटलस्नेक किंगस्नेकच्या तुलनेत जड आणि मोठा दिसत आहे'.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सापांच्या या क्लीपने लोकांना हैराण केलं आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. लोक व्हिडीओवर कमेंट आणि लाइक करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'असं वाटतं रॅटलस्नेकने नुकतंच जेवण संपवलं होतं. जेव्हा त्याला किंगस्नेकने गिळलं'. एकाने लिहिलं की, यामुळेच तुम्ही सापांना मारत नाही. शेअर करण्यासाठी धन्यवाद. हे कमाल आहे.
न्यूजवीकसोबत बोलताना डीएनआरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, किंगस्नेक सामान्यपणे ससा, कासवाचे अंडी, पाल आणि इतर साप खातो. ते म्हणाले की, किंगस्नेक विषारी सापांना मारण्यासाठी आणि त्यांना खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. तेच या व्हिडीओत बघायला मिळतं.