बालपणापासून आपण ऐकत असतो की, लहान मुलं देवाचं रूप असतात. आपण नेहमीच बघतो की, लहान मुले किती निरागस आणि निस्वार्थी असतात. त्यांचा भोळेपणा पाहून कुणीही त्यांच्या प्रेमात पडतं. अशात विचार करा तर लहान मुलगा जर कुणाची मदत करू लागला तर कसं वाटेल. अर्थातच ही बाब कुणाच्याही मनाला आवडेल.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ह व्हिडीओ बघून तुम्हाला फार आनंद होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर खास स्माईलही येईल. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक लहान मुलगा पूर्ण ताकद लावून हापशीचं हॅंडल खाली-वर करतोय. जेणेकरून कुत्र्याची तहान भागावी.
लहान मुलाच्या मेहनतीच्या या व्हिडीओने सर्वांचं मन जिंकलं आहे. हा व्हिडीओ आयपीएक अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केलाय. यासोबतच त्यांनी एक मनाला भिडणारं असं कॅप्शनही लिहिलं आहे. त्यांनी लिहिलं की 'उंची कितीही कमी का असेना, प्रत्येकजण कुणाचीही शक्य ती मदत करू शकतात'.
तुम्ही बघू शकता की, मुलगा किती लहान आहे आणि त्याला हॅंडपंप चालवण्यासाठी किती ताकद लावावी लागत आहे. त्यानंतर तो पूर्ण प्रयत्न करत हॅंडपंप चालवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कुत्र्याची तहान भागवत आहे. तुम्ही बघू शकता की, मुलगा उड्या मारून मारून हॅंडपंप चालवण्याचा प्रयत्न करत आहे. लोक या मुलांचं भरभरून कौतुक करत आहेत.